गिरड विशेष प्रतिनिधी
प्रमोद झिबड
समुद्रपुर.
![]()
दि.२६ मे २०२५ :- मंगळवार वर्धा जिल्हा समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जाम चौरस्त्यावर नागपूर वरुन आदिलाबाद येथे सोयाबीन बियाणे भरपूर जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागली या आगीत सुदैवाने कोणतीही जीव हाणी झाली नाही. मात्र ट्रक जळून खाक झाला. कार्यसम्राट समिरभाऊ कुणावार या रस्त्याने समुद्रपुर येथे येत असतांना हि घटना त्यांना दिसताच त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला. प्राप्त माहितीनुसार २६ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर वरुन ट्रक क्रमांक MH18 DG 0169 हा इंदोर येथून आदिलाबाद येथेसोयाबीन बियाणे भरून जात असताना जाम चौरस्ता येथे जेवणासाठी थांबले असता ट्रकच्या बॅटरी मध्ये शॉर्ट शर्किट होऊन ट्रकला अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून ट्रकला आपल्या कवेत घेतले या आगीत ट्रक संपूर्ण जळून खाक झाला यावेळी ट्रक चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने थोडक्यात बचावला .घटनेची माहिती हिंगणघाट व सिंदी रेल्वे येथील अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल घेऊन आग आटोक्यात आनली मात्र तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. या आगीत ट्रकसह सोयाबीन जळून 50 लाखाचे नुकसान झाले.यावेळी १ तास या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती यावेळी जाम येथील युवक,बजरंग दलाचे कार्यकर्ते माजी सरपंच सचिन गावंडे, समुद्रपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार रवींद्र रेवतकर, महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक सपाटे,त्याचे सर्व कर्मचारी राहुल मानकर घटनास्थळी व समुद्रपुर पोलीस दाखल झाले होते.


