Home Breaking News पाळण्याची दोरी गळ्यात अडकल्याने बालकाचा मृत्यू .!

पाळण्याची दोरी गळ्यात अडकल्याने बालकाचा मृत्यू .!

0
42

गिरड विशेष प्रतिनिधी

 प्रमोद झिबड

समुद्रपुर.

 

दिनांक २७ एप्रिल रविवार ला अंशू आणि त्याचा लहान भाऊ पाळना खेळत असताना तोल जाऊन पाळण्याची दोरी गळ्यात अडकल्याने गळफास लागून तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या बालकाचे निधन झाले. हि घटना गिरड येथे रविवार ला घडली अंशू अतुल कोहीचाळे वय 10 वर्ष राहणार गिरड असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. अंशू अतुल कोहीचाळे हा गिरड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग तिसरी मध्ये शिकत होता रविवारी अंशू व त्यांच्या लहान भाऊ हे दोघेही पाळन्याला खेळत होते. खेळता खेळता तोल जाऊन पाळण्याची दोरी गळ्यात अडकल्याने फास लागला त्याला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात झाले व अंत्यसंस्कार करण्यात आले.संपूर्ण गिरड नगरीत शोकाकुळ वातावरण पसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here