Home Breaking News डुक्कर आडवा येऊन कार अनियंत्रित होऊन ट्रंकरवर जाऊन धडकली या अपघात पोलीस...

डुक्कर आडवा येऊन कार अनियंत्रित होऊन ट्रंकरवर जाऊन धडकली या अपघात पोलीस कर्मचाऱ्यासह कुटुंबातील चौघाचा दुर्दैवी मृत्यू : तरोडा शिवारातील घटना..!

0
55

मनवर शेख 

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

 

समुद्रपुर : तालुक्यातील मांडगाव येथे रामनवमी निमित्ताने असलेल्या महाप्रसाद घेऊन आपल्या कुटुंबासह कारने वर्ध्याकडे निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार समोर डुक्कर आडवा आल्याने कार अनियंत्रित होऊन कार ट्रंकरवर जाऊन धडकली या भिषण अपघात पोलीस कर्मचाऱ्यासह पती, मुलगा, मुलगी या चौघाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार सोमवारी ७ एप्रिलला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वडनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत मधुकर वैद्य वय ४३ वर्ष राहणार मांडगाव हल्ली मुक्काम वर्धा हे आपल्या मांडगाव गावात रामनवमी निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी महाप्रसाद घेऊन त्यांची डिवटी व मुलाची परीक्षा असल्याने ते रात्री आपल्या कार क्रमांक MH40 KR3603 ने मांडगाव वरून वर्धा येथे जात असता तरोडा गावाच्या पुढे गेले असता कार समोर अचानक डुक्कर आडवे आल्याने डुकरास धडक लागून त्यांचे कार वरील नियंत्रण सुटून कार अनियंत्रित होऊन समोरून येणारा टँकर क्रमांक MH09CV2185 ला जाऊन धडकली या भिषण अपघात पत्नी प्रियंका प्रशांत वैद्य वय ३७ वर्ष व मुलगा प्रियांश प्रशांत वैद्य वय ८ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत मधुकर वैद्य वय ४३ वर्ष व त्यांची मुलगी माही प्रशांत वैद्य वय ३ वर्ष हे गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी वाहनाने कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मुलगी माही हिला तपासून मृत घोषित केले तर प्रशांत वैद्य डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूमध्ये होल पडले होते त्यामुळे नागपूर येथे रवाना केले असता त्यांचा मृत्यु झाला एकाच परिवारातील चारही सदस्याच्या असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळाताच एपिआय सपाटे,भोगे,काकडे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त दोन्ही वाहनाना रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. पुढिल तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here