Home Breaking News गिरड येथील मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून केली ईद साजरी !

गिरड येथील मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून केली ईद साजरी !

0
70

मनवरशेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गिरड येथे दिनांक 31 3 2025 रोजी सोमवारला सकाळी आठ तीस वाजता ईद उल फितर ची नमाज ईदगा येथे मौलाना हाफिज मुक्तार आलम हाश्मी यांच्या उपस्थितीत हजारो मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावून नमाज पठण केली गिरड येथे शांतीपूर्वक वातावरणात सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श घडवून दिला. तसेच गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास जी गायकवाड सर व गोमेद पाटील सर. तसेच पोलीस कर्मचारी अमरधोटे गणेश इंगळे राजू ठाकरे व संपूर्ण पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांकडून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित पोलीस शांतता समिती जेष्ठ नागरिक अध्यक्ष अब्दुल कदिर. गुड्डू भाई. इरफान सय्यद. नवाब भाई. मुनी खा नवाब .मुस्तफा शेख. नईम काझी. रियाज पटेल. अमन पटेल. हमीद पटेल. आरिफ शेख. नईम शेख. परवेज काजी. सोहेल काझी. शाहिद सय्यद. शम्मी काझी. मोहम्मद भाई. युसुफ भाई. तसेच गिरड व परिसरातील मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here