मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
हिंगणघाट :- राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे जागतिक महिला दिन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून करण्यात आली. जागतिक महिला दिनी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डान्स स्पर्धा, गाण्यांची स्पर्धा, भाषण स्पर्धाचे आदि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. स्वाती अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विजेत्या स्पर्धकांना सौ.स्वाती अतुल वांदिले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम पुरस्कार भावना समर्थ यांनी पटकावला तर डान्स स्पर्धेमध्ये सृष्टी ठाकरे, दृतीय बक्षीस पलक टिपले यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सीमा तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजाता जांभुळकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, शहर सरचिटणीस सविता गिरी, ओबीसी शहराध्यक्ष आंचल वकील, प्रणिती टिपले, भावना समर्थ, शिल्पा ठाकरे, मोनाली वाघमारे, अर्चना कांबळे, साधना सावरकर, रेशमा सावरकर, कुसुम टिपले, वैशाली रहाटे, अर्चना डोंगरे, करुणा वानखेडे, दिपाली जगताप, नयना मेश्राम, यशोधरा शंभरकर, दिव्या जांभुळकर, माधुरी रहाटे, नयना फुलमाळी, स्वाती जांभुळकर, प्रीती जांभुळकर, छायाताई काळे आदी महिला उपस्थित होत्या.


