Home Breaking News कत धुंडू नायक बापू एक वळा आजो जगेमाई..!

कत धुंडू नायक बापू एक वळा आजो जगेमाई..!

0
64

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

सोना गार्डन सारखणी येथे दि.07.03.2025 ला श्री दिलीप पवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात पाहुणे मंडळीचे मनोरंजन व प्रबोधन व्हावे या हेतूने प्रसिद्ध गायक श्री सुनिल चव्हाण निर्मित जिव्हाळा कला संचास निमंत्रित करण्यात आले होते.श्री दत्तराव मोहिते यांच्या विनंती वरून स्व.प्रदिप नाईक यांच्या आठवणी वर आधारित गीत गायनाला सांगितले असता श्री सुनिल चव्हाण यांनी… कत् धूंडू नायक बापू एक वळा आजो जगेमाई….हे सुंदर असे गीत गाऊन पाहुणे मंडळीना भावूक केले स्व.प्रदिप नाईक यांच्या पत्नी श्रीमती बेबीताई प्रदिप नाईक यांना सुध्धा अश्रू अनावर झाले काही वेळा पुरता मंडपातील वातावरण अगदी शांततामय झाले होते.जिव्हाळा कला संच च्या कलावंतांनी एका पेक्षा एक असे भक्ती गीते भावगीते हिंदी मराठी बंजारा व प्रबोधनपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली या वेळी बरीच पाहुणे मंडळी हजर होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here