Home Breaking News धर्माबाद तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टेक ची नोंदणी करून घ्यावी… उपविभागीय अधिकारी...

धर्माबाद तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टेक ची नोंदणी करून घ्यावी… उपविभागीय अधिकारी सौ. स्वाती दाभाडे मॅडम.! 8 मार्च ते 13 मार्च दरम्यान प्रत्येक गावोगावी विशेष मोहीम राबवणार… तहसीलदार सौ. सुरेखा स्वामी मॅडम..!

0
38

 

 

 

सय्यद ईसा 

जिल्हा प्रतिनिधि

नांदेड.

दि.६ मार्च : नांदेड (सय्यद ईसा) धर्माबाद तालुक्यात आज दिनांक 6 मार्च 2025 रोजी मा. उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ऍग्रीस्टेक कार्ड ची माहिती व चर्चा बैठक घेण्यात आली आहे. ॲग्रीस्टेक ची प्रत्यक्ष नोंदणी जानेवारी महिन्यात सुरुवात झाले असून ‘ॲग्रीस्टेक वर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची ‘कुंडली’च कळणार आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.

आधार कार्डप्रमाणे आता केंद्र सरकारने शेतकरी ओळख क्रमांक मिळविण्याबाबतची नोंदणी सुरू झाली आहे. धर्माबाद तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या अंदाजे 30 हजार इतकी असून या ॲग्रीस्टिकच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची ‘कुंडली’च कळणार आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. स्थानिक पातळीवर महसूल, कृषी, ग्रामसेवक,सरपंच सीएससी सेंटर, सेतू केंद्र चालक आणि ग्रामविकासच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी सुरू असून सर्वांनी यामध्ये मदत करणे आवश्यक असल्याचे आवाहन धर्माबाद तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सौ. स्वाती दाभाडे मॅडम यांनी केले आहे.

राज्यामध्ये कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने वापर व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाची ‘अॅग्रिस्टॅक’ योजना राबविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामार्फत मदत घेऊन शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करावयाची असून शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प फायद्याचा आहे.

अॅग्रिस्टॅक’ काढल्यामुळ थोडक्यात शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. शेतकरी योजनांमधून कर्जासारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी याचा फायदा होणार असल्याचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची नोंदणी करून घेण्याचे आव्हान मा. तहसीलदार सौ सुरेखा स्वामी मॅडम यांनी केले आहे.

 

 

*चौकटीमध्ये*

 

*काय आहे ॲग्रीस्टॅक ?*

 

ॲग्रीस्टॅक ही एक क्रांतिकारक संकल्पना आहे जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते.

 

*फार्मर आयडी म्हणजे काय?*

फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक आहे तो ॲग्रीस्टॅक अंतर्गत तयार केला जातो ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जमिनीचा सातबारा ही माहिती समाविष्ट असते.

 

*तुमचा फार्मर आयडी तुमच्याकडे आहे का?*

 

जर का अजूनही फार्मर आयडी आणि ऍग्रीस्टॅक संकल्पना विषयी माहिती नसेल तर आजच आपले गावचे कृषी अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहाय्यक, तलाठी ,सीएससी केंद्र किंवा आपले सरकार केंद्र यांच्याशी संपर्क साधा.

 

*तुमच्या गावात ( फार्मर आयडी कॅम्प ) येतोय खालील कागदपत्रासह तयार आहात का?*

 

1. तुमच्या जमिनीचा सातबारा किंवा आठ अ कागदपत्र सोबत ठेवा. तुमच्या जमिनीचा अधिकृत पुरावा आवश्यक आहे.

2. आधार कार्ड जोडणी असलेला मोबाईल नंबर घ्या जर मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन जोडणी करून घ्या.

3. कॅम्प ची तारीख व ठिकाण जाणून घ्या तुमच्या गावातील महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा.

4. कॅम्पच्या दिवशी हजर राहा तुमच्या गावातील कॅम्प साठी वेळेत पोहोचा आणि नोंदणी करून घ्या.

 

*ॲग्रीस्टॅकमुळे होणारे फायदे*

 

1. पी एम किसान डीबीटी लाभ

2. डिजिटल पीक कर्ज

3. पिक विमा

4. एम एस पी लाभ

5. हवामान खात्याची सूचना

6. पिकविषयी सल्ला

7. मृदा आरोग्य माहिती

8. बाजारभाव माहिती

9. पीक पेरणी व उत्पादन वाढीसाठी अचूक मार्गदर्शन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here