Home Breaking News परडा येथिल मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड: मनोहर बारई...

परडा येथिल मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड: मनोहर बारई यांनी १७ वर्ष भारतीय सैन्यदलात दिली सेवा.!

0
59

 

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधि 

समूद्रपुर.

 

वर्धा जिल्हा: समुद्रपुर: तालुक्यातील परडा येथिल छोट्याश्या गावातील १७ वर्ष सैन्यदलात सेवा दिलेल्या मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन साठी निवड झाली असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.२३ फेब्रुवारीला दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अपोलो मॅराथॉन मधून जग प्रसिद्ध असलेली बुस्टन अमेरिका मॅराथॉन निवड झाली आहे.

विशेष म्हणजे मनोहर बारई यांनी १७ वर्ष भारतीय सैन्यदलात सेवा दिली असून ते सध्या ते ब्रम्हपुरी येथील भारतीय स्टेट बँक नौकरी करीत आहे. दिल्ली येथे झालेल्या ४२.१८५ किलोमीटर मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. त्यांनी या स्पर्धेत ४२.१८५ किलोमीटर अंतर ३ तास २२ सेंकद इतक्या वेळेत पूर्ण केले होते. जग प्रसिद्ध बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेत निवड होण्यासाठी ३ तास ५ मिनीट पुर्ण करावयाचा होता मात्र मनोहर बारई यांनी हे अंतर अवद्या ३ तास २२ सेंकद मध्ये पूर्ण करून त्यांनी जग प्रसिद्ध बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी आपले स्थान निच्छीत केले आहे. मनोहर बारई यांनी नागपूर येथील एन आय एस कोच डॉ सुनिल कापगाते यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे.मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here