Home Breaking News सौ.गिरजाबाई विनायकराव आगळे यांना जिजाऊ रत्न पुरस्कार जाहीर.!

सौ.गिरजाबाई विनायकराव आगळे यांना जिजाऊ रत्न पुरस्कार जाहीर.!

0
62

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

माहूर तालुक्यातील वानोळा येथील वसंतराव नाईक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक विनायक राव आगळे यांच्या सुविद्य पत्नी सौ गिरिजाबाई विनायकराव आगळे पाटील यांना मराठा सेवा संघ आयोजित शिव जन्मोत्सव सोहळा 2025 साठी दिला जाणारा जिजाऊ रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सौ गिरजाबाई आगळे यांचे कुटुंब म्हणजे तीन मुले आणि पती विनायकराव आगळे हे वानोळा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल 33 वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांची धर्मपत्नी सौ गिर्जाबाई आगळे यांनी आपल्या तीनही मुलावर योग्य सुसंस्कार देऊन त्यांना अतिशय उच्च पदावरील अधिकारी बनविण्यात यश मिळविले आहे.यामध्ये पहिला मुलगा विथ व लेखा अधिकारी परभणी,दुसरा मुलगा कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई, तिसरा मुलगा उप आयुक्त आयपीएस कलकत्ता तर पहिली सून बीडीएस डेंटल स्पेशलिस्ट दुसरी सून कक्षा अधिकारी मंत्रालय मुंबई व तिसरी सून एम एस सी बी एड प्राध्यापिका असे गिरजाबाई विनायकराव पाटील आगळे यांचे कुटुंब आहे त्यांच्या सर्वोत्तम कार्याची दखल घेऊन त्यांना मराठा सेवा संघाच्या वतीने हा जिजाऊ रत्न पुरस्कार घोषित करण्यात आला असून 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती निमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे लेखी पत्रान्वये अध्यक्ष शिवश्री वाघमारे,स्वागत अध्यक्ष शिवश्री पंडितराव कदम यांच्या स्वाक्षरीने कळविण्यात आले आहे. सौ गिरजाबाई विनायकराव आगळे यांना जिजाऊ रत्न हा पुरस्कार देण्यात येणार असल्याने वानोळा व परिसरात गिरजाबाई आगळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here