राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर.
वर्धा : ओबीसी, व्हिजेएनटी ( एकनाथ शिंदे गट ) या विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पिसवे यांनी मुंबईतून एका पत्राद्वारे यांची बिनविरोध निवड केली आहे. रामेश्वर लांडे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून अधिकृत सदस्य झाले आहे.
महाराष्ट्रात ओबीसी, व्हिजेएनटी (शिंदे गट)विभागाची स्थापना करून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये वर्ध्याचे रामेश्वर लांडे यांची सुद्धा वर्धा जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती नुकतीच करण्यात आली.
नियुक्तीचे सर्व श्रेय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे शिवसेना ओबीसी, व्हिजेएनटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पिसवे, निवड समिती सदस्य संजय कुसळकर अनिल पाटील सचिन धायगुड,मेघशाम करडे आणि मित्र मंडळींना देतात. रामेश्वर लांडे हे वर्धा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक असून यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून. या निवडीबद्दल यांचेवर सर्व स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


