Home Breaking News श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा

श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा

0
54

राजु कांबळे

तालुका प्रतिनिधी 

समुद्रपुर.

समुद्रपूर : समुद्रपूर तालुक्यातील स्थानिक गिरड येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 56 वा पुण्यस्मरण सोहळा दिनांक 29 30 व 31 जानेवारी 2025 ला संपन्न झाला. या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वामनरावजी झिंगरे, ज्येष्ठ प्रसारक कार्यक्रमाचे उद्घाटक गोभक्त श्री अर्जुन जी तीरगम, प्रमुख उपस्थिती गिरड चे सरपंच माननीय श्री. राजूभाऊ नौकरकर,श्री.मनीष जी जगताप जिल्हा अध्यक्ष ग्रामगीता जीवन विकास परीक्षा, ठाणेदार माननीय श्री. संदीप जी गाडे साहेब, विकास महा चे प्राध्यापक अभिजीत डाखोरे, अध्यक्ष वाईस ऑफ मीडिया विदर्भाचे किशोरजी करंजीकर, निलेश पिंजरकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रमणी ढेंगळे यांनी केले तर प्रस्ताव श्री.गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विष्णू भाऊ ब्राह्मणवाडे यांनी केले.

“जागर राष्ट्रसंतांच्या विचाराचा” या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी समाज प्रबोधनकार प्रा. अनंतजी राऊत यांच्या लिखित ‘मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा’ या कार्यक्रमाचे आयोजन 29 जानेवारी सकाळी 11 ते दुपार 2 वाजेपर्यंत करण्यात आला होता. तसेच पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक माणसी वनारसे, द्वितीय क्रमांक नयन लाजूरकर, तृतीय, क्रमांक वेदांत भांदककर, चतुर्थ क्रमांक आयुष भांदककर, पाचवा क्रमांक पियाली तेलरांधे , सहावा क्रमांक अवंतिका तेलरांधे,

तसेच गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अथर्व शिवणकर, द्वितीय क्रमांक बादल बोरेकर, तृतीय क्रमांक सबा शेख,चतुर्थ क्रमांक परिधी चचाने

आणि विदर्भस्तरीय दिंडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शंकरशाही भजन मंडळ भवानपुर,द्वितीय क्रमांक श्रावण बाबा महिला भजन मंडळ भिवि,तृतीय क्रमांक न्यू तरुण उत्साही भजन मंडळ गिरड, चतुर्थ क्रमांक श्री गुरुदेव महिला भजन मंडळ आलेसुर, पाचवा क्रमांक अनुसया माता महिला भजन मंडळ गिरड, सहावा क्रमांक मंजुळा माता भजन मंडळ, सातवा क्रमांक संत ज्ञानोबा माऊली महिला भजन मंडळ, आठवा क्रमांक सती सोनामाता भजन मंडळ गिरड, नववा क्रमांक विद्यार्थी माऊली भजन मंडळ गिरड, दहावा क्रमांक जय भोले शालिक बाबा भजन मंडळ गिरड, अकरावा क्रमांक सद्गुरु सोना दुर्गा भजन मंडळ, बारावा क्रमांक सती अनुसया भाता माता मंडळ भजन मंडळ शिवणफळ,

ग्रामगीता ओवी भावार्थ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक उन्नती पाणबुडे, द्वितीय क्रमांक गुंजन गुडदे,तृतीय क्रमांक पूनम चंदनखेडे यांना प्राप्त झाले.

तसेच गिरड भूषण सन्मानाने रुग्ण मित्र भूषण चंद्रकांतजी पाठक, नवोद्योजक तुषार सुभाषजी भजभूजे यांना प्रदान करण्यात आला. ग्रामनाथला ग्रामगीता अर्पण गिरड नगरीतील आदर्श शेतकरी श्री विवेक दादा अंबादासजी डंबारे यांना शाल श्रीफळ, ग्रामगीता सन्मान चिन्ह अर्पण करण्यात आले होते.

गिरड नगरीतील बाल कीर्तनकार कुमार प्रसाद कैलास महाकाळकर यांचे राष्ट्रीय एकात्मता अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती या विषयावर प्रबोधनात्मक किर्तन सादर करण्यात आले. दिनांक 30 जानेवारी ला महिला सक्षमीकरण व संघटन करण्याच्या दृष्टीने महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे तसेच गोपाल काल्याचे किर्तन श्रीहरी महाराज घरतकर शास्त्री यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गोपालकाला विचारमंथन कार्यक्रमात आमदार समीर भाऊ कुणावार, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी श्री. प्रभाकर गायकवाड ,श्री. तुषार गिरडे,श्री. अतुल भाऊ काळबांडे , नूतन जी गिरडे,महेश जिगर, मंगेश गिरडे, सुमित भिसेकर, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश चंदनखेडे,श्री. फकीराजी खडसे यांच्या हस्ते सर्व स्पर्धेत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आला.

या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप रात्री साठा साडेआठ वाजता संस्काराचे मोती जागर लोककलेचा गिरड नगरीतील बाल उपासकांच्या नाट्यमय व समाज प्रबोधनाने करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. विजयाताई तेलरांधे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. सौ. प्रणाली ताई दीपक जी सायंकाळ, सौ. माधवी ढगे, कविताताई येनुरकर, सौ. मीनाक्षीताई शिवणकर, सौ. निर्मलाताई दडमल, रेखाताई डरे,सौ. सोनलताई वाघ यांची उपस्थिती होती. सायंकाळी ब्रह्मलीन वंदनीय महाराजांना मौन श्रद्धांजली, सर्वधर्म प्रार्थना अर्पित करण्यात आली होती. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने दीप महोत्सव दीप साजरा करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा अग्निहोत्री मॅडम यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव संदीप शिवनकर, गोपाल तेलरांधे, नितीन लाजूरकर, सौरभ शेळके, वैभव अंडरस्कर, गौरव कावळे, श्लोक राजूरकर, साहिल सोनवणे, मंथन भांदककर, सचिन उंबरकर, स्वप्निल रोहनकर, भावेश ब्राह्मणवाडे, श्लोक मिसाळ,सुषमाताई दुबे, रोशनी तेलरांधे, पुनम ब्राह्मणवाडे, संगीता देवताळे, नंदिनी टिपले अर्चना बारोकर रूपाली पाणबुडे, वेदिका चामचोर, मानसी चामचोर, कृष्णा गुंडे, संजना फोपारे या सर्वांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here