चंद्रपुर :- महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. ना. नितेशजी निलम नारायण राणे यांची भव्य हिंदु धर्म सभेचे आयोजन रविवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ सायं ०६:३० वा. चंद्रपूर महानगर पालिका ग्राउंड, गांधी चौक येथे आयोजित करण्यात आल्यामुळे N.D. हॉटेल, नागपूर रोड ते गांधी चौक पर्यंत भव्य दुचाकी व चारचाकी रॅली दरम्यान हिंदुत्ववादी धर्मयोद्धा नामदार नितेशजी राणे यांचे भव्य स्वागत चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने चांदा क्लब समोर करण्यात आले.
चंद्रपुर येथील माता महाकाली नगरीमध्ये प्रथम आगमनानिमित्त मा. ना. नितेशजी राणे साहेबांचे शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम व बल्लारपुर विधानसभा महिला संघटिका कृष्णा सुरमवार यांनी भगव्या रंगाची शाल, श्रीफळ व औक्षवंत करुन स्वागत केले. यावेळी शिवसेना दिपक रेड्डी उपतालुका प्रमुख विक्की महाजन, गुरदास मेश्राम, उपशहर प्रमुख सूचक दखने, उपशहर प्रमुख विश्वास खैरे, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे, विभाग प्रमुख अजय चौधरी, विवेक दुर्गे, निखिल भोयर तसेच असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.