राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर.
समुद्रपूर. विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गिरड/ शि.म.कृ.झो. पा. कन्या विद्यालयचे वतीने आज दिनांक 26 जानेवारी 2025 ला भारतीय गणराज्य दिन सोहळा संपन्न करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून विकास विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य माननीय श्री.एस. व्ही. तडस साहेब यांच्या तर कन्या विद्यालय च्या वतीने प्रभारी मुख्याध्यापक श्री सुनील येनोरकर सर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावित शाळेच्या बँड पथका द्वारे राष्ट्रगीत व सलामी देत ध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी विद्यार्थी वर्ग यांनी दिलेला जयघोषाने शाळेचा परिसर स्वतंत्र प्रकाशांनी उजळून निघाला या प्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थिती होते.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लगेच क्रीडा शिक्षक राजु कांबळे सर यांच्या द्वारे लेझीम ग्रुप पथकाने प्रात्यक्षिक व नृत्य व सादर करीत समुहगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. सुहास चाफले यांनी राष्ट्रीय सणाचे महत्त्व, गणराज्य दिन व लोकशाही सबलीकरण, संविधान निर्मिती, सुजाण नागरिक त्याचे कर्तव्य याबाबत महत्व विश्लेषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद तडस सर यांनी मनोगता द्वारे शाळेतर्फे भविष्यासाठी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या.
या उत्सव सोहळ्याची सांगता आभारप्रदर्शन व सामूहिक राज्यगीत गायन करून जयघोषाने झाली.


