गिरड़ विशेष प्रतिनिधि
प्रमोद झिबड
समुद्रपूर
![]()
समुद्रपूर तालुक्यातील तालुक्यातील येदलाबाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येदलांबाद येथे 76 वा प्रजासत्ताक दिन गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक श्रीमान उराडे सर तसेच शिक्षक उमाटे सर यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाविषयी उपस्थितताना मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे गिरड ग्रामपंचायतचे सदस्य व माजी पंचायत समिती सदस्य शेख इसराइल यांनी उपस्थित विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना संविधानाविषयी व प्रजासत्ताक दिनाविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली.
![]()
यावेळी संविधान पर्भात फेरी काडून नागरिकांना जागरूक करण्यात आले उपस्थित शाळा समिती अध्यक्ष अंबाडारे. पोलीस पाटील सागर वाघाडे. पत्रकार किशोर शेंडे. माजी पोलीस पाटील हिरामण मून. अंगणवाडी सेविका छायाताई नेवारे. मदतनीस उषाताई गजभिये. वनिता ठाकरे. व यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते उपस्थिततांना अल्पहार देऊन. कार्यक्रम समापन असे जाहीर करून श्री उमाटे सर यांनी आभार मानले.


