Home Breaking News युवा सेना वर्धा लोकसभा प्रमुख पदावर निखिल सातपुते यांची नियुक्ती जाहीर ..!

युवा सेना वर्धा लोकसभा प्रमुख पदावर निखिल सातपुते यांची नियुक्ती जाहीर ..!

0
56

राजु कांबळे 

तालुका प्रतिनिधी 

समुद्रपुर

 

समुद्रपूर. : युवा सेनेच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यात तरुणांना संघटनेची जोडून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरनेने संघटनात्मक बांधणी करण्याचे आदेश युवासेना सचिव माननीय शुभम नवले यांच्या नेतृत्वात केले जाईल असे यावेळी निखिल सातपुते यांनी संबोधित केले.

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शिवसेना( शिंदे गट ) वर्धा जिल्हा युवा सेना लोकसभा प्रमुख पदावर श्री. निखिल सातपुते यांचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात माननीय श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात माननीय आमदार कृपालजी तुमाने साहेब यांच्या हस्ते पूर्व विदर्भ प्रमुख माननीय किरण पांडव व युवा सेना काराध्यक्ष माननीय पुर्वेश सरनाईक यांच्या आदेशाने नियुक्ती जाहीर केली.

या नियुक्ती करिता शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ, गणेश ईखार, जिल्हा संघटक संदीप इंगळे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंगेश रावेकर, महेश मुडे,उपजिल्हा प्रमुख रवी धोटे, सुरज पिठेकर, मंगेश भोंगाडे, अशोक भिवगडे, लोभेश बोंडे, मयूर ढाकरे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here