मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
नागपूर जिल्ह्यातील सिरसी येथे परमात्मा एक मानव जागृती सेवा संस्थांच्या वतीने दिनांक 19 जानेवारी 2025 ला सेवक संमेलन तथा हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गिरड परिसरातील तसेच शिरशी क्षेत्रातील व भंडारा गोंदिया मध्य प्रदेश या भागातील सेवकांनी सहभाग घेऊन सिरसी येथे भव्य आणि दिव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते शिरसी शहरातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक प्रस्थान करण्यात आली होती व श्री रंगनाथ बाबा सांस्कृतिक भावनांमध्ये या शोभा यात्रेचे समापन करण्यात आले लगेच भगवंताच्या महापूजेला सुरुवात करण्यात आली त्याला जोडून सत्संगाच्या कार्यक्रमाला आयोजित करण्यात आले व भजन संध्याचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला हजारो सेवकांनी उपस्थिती दर्शवून सत्संग व हवन पूजेचा लाभ घेतला लगेच महाप्रसादाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजक समिती सिरसी व गिरड एरियातील सर्व कार्यकर्त्यांनी अति मोलाचे कार्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.


