Home Breaking News माध्यमिक कन्या विद्यालयाने रोवला तळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा.!

माध्यमिक कन्या विद्यालयाने रोवला तळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा.!

0
62

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

 

कृषक सुधार मंडळ, तळेगाव दशासर द्वारा संचालित माध्यमिक कन्या विद्यालय, तळेगाव या शाळेनी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान 2024-25 , टप्पा -2 मध्ये धामणगाव रेल्वे तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावला. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.दिनांक 9 जानेवारीला माननीय आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा संकुल धामणगाव येथे बक्षीस वितरण संपन्न झाले या पुरस्काराकरीता सर्व स्तरावरून कृषक सुधार मंडळ व विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव देशमुख व सर्व पदाधिकारी यांनी विद्यालयाचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here