मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट
साहित्याचे केले वितरण व्हील चेअर ठरली अनेकांसाठी आधार मंत्री झाल्यावरही जिव्हाळा कायमच डॉक्टर पंकज भोयर यांनी दिव्यांगाच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेतला आहे त्यामुळे त्यांची दिव्यांगा सोबतच आपुलकीची भावना निर्माण झाली असून समाजातील दुर्लक्षित असलेल्या या घटकांसोबत डॉक्टर भोयर यांनी आपले पणाची भावना जोपासली आहे मागील दहा वर्षापासून ते दिव्यांग्यासोबत जन्मदिवस साजरा करतात आता मंत्रिपद मिळाल्यावरही त्यांनी हा जिव्हाळा ठेवल्याने दिव्यांग दिव्यांगानीही कृतज्ञता व्यक्त केली तसेच दिव्यांग यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे अभिवचन यावेळी राज्यमंत्री भोयर यांनी दिव्यांगांना दिले


