प्रमोद झिबड
विशेष प्रतिनिधी
गिरड/समूद्रपूर्
समुद्रपुर : तालुका स्तरीय जि.प. क्रीडा स्पर्धा वासी येथील जे. डी. चौधरी सायन्स महाविद्यालय च्या क्रीडांगणावर दिनांक ३ व ४ जानेवारीला पार पडल्या. या क्रीडा स्पर्धेत समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने लंगडी खेळा मध्ये प्रथम क्रमांक, खो – खो मध्ये प्रथम क्रमांक, शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक व थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून, घवघवीत यश प्राप्त करून विजयश्री चे मानकरी ठरले.
तसेच या स्पर्धे मध्ये गिरड बिट चॅम्पियन शिल्ड चे विजेते बनले. गिरड बिट अंतर्गत पिंपळगाव, कोरा, मंगरूळ, गिरड या केंद्राचा समावेश आहे.
या सर्व विजयश्री बद्दल पंचायत समिती समुद्रपुरचे गटशिक्षणाधिकारी मान.श्री.गिद्देवार साहेब, केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख श्री. अशोकजी आडे साहेब, समूह साधनव्यक्ती श्री. श्रीकांत कावटे सर, शाळेच्या वतीने कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मायाताई चाफले मॅडम, श्री. महाजन सर, सौ. माया सवाई, कु. मनीषा जांभुळे, कु. नंदा पारीसे, कु. सुषमा डफ , कु. भारती डकरे , कु. सीमा शेख व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. श्याम भाऊ गाठे, उपाध्यक्षा सौ. शारदा वाघे व सदस्य गण यांनी गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचे त्यांनी मिळविलेल्या यशा बद्दल खूप खूप अभिनंदन केले.
केंद्र प्रमुख, मुख्याध्यापिका, प्रशिक्षक कोच तसेच खेळाडू यांच्यावर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सर्व विजेते खेळाडूंची जिल्हा स्तरीय स्पर्धे करिता निवड झाली आहे.


