राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर.
समुद्रपूर : भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदनामीकारक केलेल्या विधानाबाबत माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन समस्त लोकांतर्फे देण्यात आले.
![]()
भारताचे गृहमंत्री अमित शाहा यांनी दिनांक 17/ 12/ 2024 रोजी राज्यसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमान कारक विधान केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान आहे.भारताच्या संविधानाचे निर्माते आहे.त्यामुळे गृहराज्यमंत्री अमित शाहा यांनी भारतीय समस्त जनतेचा, समस्त देशाचा आणि भारतीय संविधानाचा अपमान केलेला आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहो आणि या संदर्भामध्ये आम्ही आमच्या भावना आपणासमोर व्यक्त करीत आहोत. भारताचे गृह मंत्री अमित शाहा यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्या बद्दल ॲट्रॉसिटी चा गुन्हा रजिस्टर करण्यात यावा. या करीता मोर्चा काढून असे निवेदन दिले गेले आहे.
या उपस्थितीत राकेश उरकुडे, राकेश गजभिये, प्रतीक बलवीर, इंद्रपाल ढोरे, आकाश म्हैस्के, नरेश ठोकरे, बबन धुर्वे, शुद्धोधन मुन, सोनम मेंढे, गायत्री गावंडे आणि समस्त ग्रामवासी हे सगळे उपस्थित होते .


