चंद्रपुर :- शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे आदेशाने तसेच शिवसेना महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय विभागाचे समन्वयक अॅड. श्री. वैजनाथजी वाघमारे आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व चंद्रपूर निरीक्षक आमदार कृपालजी तुमाने यांचे मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी मुंबई येथील हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे भवन येथे सौ. कृष्णा सुरमवार यांची शिवसेना महिला आघाडीच्या बल्लारपुर विधानसभा संघटीका पदी नियुक्ति पत्र देवून शिवसेना पक्ष संघटनेचा विस्तार करण्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मुंबई येथील हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे भवनात शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, वैद्यकिय मदत कक्ष जिल्हाप्रमुख तथा वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, वैद्यकिय मदत कक्ष जिल्हा प्रमुख दिपक कामतवार, कोरपना तालुका प्रमुख राकेश राठोड, घुग्घस शहर प्रमुख महेश डोंगे, गडचांदुर शहर प्रमुख विक्की राठोड, युवासेना चंद्रपुर महानगर प्रमुख दिपक रेड्डी, भद्रावती नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, महिला आघाडी भद्रावती तालुका प्रमुख सौ.योगिता घोरुडे, महिला आघाडी वरोरा तालुका प्रमुख अल्काताई पचारे, चंद्रपुर उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, चंद्रपुर उप महानगर प्रमुख सूचक दखने, कामगार जिल्हा उपाध्याक्ष बंटीभाऊ हेमके, कामगार भद्रावती तालुका अध्यक्ष योगेश म्यानेवार, कामगार भद्रावती उप शहर प्रमुख विवेक दुर्गे, महिला आघाडी भद्रावती उप तालुका प्रमुख राधा कोल्हे, उपशहर प्रमुख सौ. सविता तरारे, गौराडा शाखा प्रमुख मंदाबाई धान्दे, युवासेना गड़चांदुर उप शहर प्रमुख अयान पठान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.*