Home Breaking News ग्रा.पं.च्या दुर्लक्षाने नागरिक क़ायम रुग्णालयात मारतात चक्रा…!

ग्रा.पं.च्या दुर्लक्षाने नागरिक क़ायम रुग्णालयात मारतात चक्रा…!

0
62

 

जिवती/ चंद्रपूर:- जिवती धोंडाआर्जुनी- ग्रा.पं.अंतर्गत असलेल्या गोंडगुडा , लभान तांडा धोंडाअर्जुनी, नागापूर हे तिन गावें ग्रां.पं.प्रशासनाच्या हेतुपरस्सर दुर्लक्षामुळे समस्याच्या विळख्यात अडकली आहेत.गावकर्यांना स्वताच्या आरोग्या साठी मोठ्या समस्याना तोंड द्यावें लागत आहे,गावातील काहीक भाग चिखलमय झाला असुन, रस्त्यांच्या कडेला नाल्या मध्ये, रसत्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी पडल्याने विविध ठिकानी पानी साचले आहे, त्यामुळे गावात मचेरचा मोठ्या प्रमाणात उगम झाल्या कारणाने, नागरिकाना मलेरिया, टाइफाइड ,डेंगू, यासारख्या मोठ्या बिमाऱ्यांच्या विळख्यात नागरिक. पोहोचले आहेत. रोडच्या काटेला मोठ्या प्रमाणात घाण निर्माण झाली आहे, गावातील गवतही कापन्यात आलें नसून.गावातील ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या नाली सफाई केल्या नसुन गावातील नागरिकांनचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात अपवादात्मक वगळता पथदिवे नाहीत, यांचें मुख्य जबाबदार, ग्रां.पं. संचिव. सरपंच व उपसरपंच आहेत.ग्रां.पं. सचिव हापत्यातुंन एक ते दोन दिवस येतात. गावातील समस्यांविषयी विचारणा करायला गेलेल्या नागरिकांना वेवसथीत रित्या, बोलतं नाहीत उडवा उडवीची भाषा करतात,व तुम्हाला काय समजते या शब्दात उद्धटपनाने उत्तरे देतात. ग्रा.पं. सचिवामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे ग्रामस्थांनी यावेळी आरोप केला आहे.

◾गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रा.पं. च्या ग्रामसेवक व. ग्रा.पं. सरपंच उपसरपंचांनी गावातील समस्या कडे लक्ष देण्याची गरज आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत नागरिक रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहेत गावात मोठ्या प्रमाणात बिमारीचे पेशंट वाढलेले आहेत. ▪️भरत बिरादार शिवसेना तालुकाप्रमुख.

◾ गावातील समस्या कडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही ग्रा.पं. ग्रामसेवक व .सरपंच उपसरपंच यांच्याकडे तक्रार करायला गेल्यास तक्रारीचे निवारण होत नाही. त्यामुळे तक्रार कुणाकडे करायची ▪️ग्रां.प. नागरिक धोंडाअर्जुनी -कपिल राठोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here