चंद्रपूर:- ८ मार्च जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानासाठी जगातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिवस साजरा करण्यात येते.तसेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्था द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात मुखतः म्हणजे चंद्रपूर शहरात स्थित असलेल्या दुर्गापूर पो.स्टेशनात महिला दिवासच्या कार्यक्रम घेण्यात आला.
![]()
आजचे सत्कार मुर्ती म्हणजेचं दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक सौ.लता वाडीवे मॅडम यांचा स्त्री शक्ती बहुद्देशी संस्था चंद्रपूर च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ॲडव्होकेट विणा बोरकर, सौ.संतोषी ताई चौव्हान, सौ.अंजली मेश्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा आणि अगदी कमी वयात वाहन चालक म्हणून कार्यरत असलेल्या कु . पल्लवी उईके यांचा सत्कार करण्यात आले. सौ.लता वाडीवे मॅडम यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी मार्गदर्शन दिले.आणि महिलावर आधारित नवीन कायद्याबद्दल माहिती दिली. महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सतत कार्यरत असतात आणि नेहमीच कार्यरत असतील असे आश्वासनही दिले.या कार्यक्रमाला यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी सौ.विद्या मुन, सौ.जया खोब्रागडे, सौ. लक्ष्मी तावडे, सौ.सुनंदा खोब्रागडे उपस्थित होत्या.


