Home Breaking News वर्धेजिल्हा अध्यक्ष मा श्री दिलीप दादा पोटफोडे यांच्या नेतृत्वात गाव तिथे राष्ट्रवादी...

वर्धेजिल्हा अध्यक्ष मा श्री दिलीप दादा पोटफोडे यांच्या नेतृत्वात गाव तिथे राष्ट्रवादी घर तिथे राष्ट्रवादी सैनिक,राष्ट्रवादी च्या आर्वी विधानसभा आढावा बैठकीत ठराव

0
61

*नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार*

आर्वी : आर्वी येथे अजितदादा पवार यांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप शा. पोटफोडे यांच्या अध्यक्षतेत तथा महिला आघाडी वर्धा जिल्हाध्यक्षा (ग्रामीण ) सौ अश्विनी गो. शिरपूरकर, तसेच महिला आघाडी वर्धा जिल्हाध्यक्षा रोजगार व स्वयं रोजगार सेल सौ, रेखा रविंद्र वानखडे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली या. बैठकीत, नुकत्याच नियुक्त झालेल्या पदाधिकारी यांचा पुष्पगुछ, श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच दिलेल्या जबाबदारी ला योग्य न्याय देत संघटन वाढीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा लावण्याची अपेक्षा व्यक्त करत संघटना मजबुती साठी कामाला लागण्या संबंधाना सविस्तर चर्चा झाली, यावेळी गाव तिथे राष्ट्रवादी व घर तिथे राष्ट्रवादी सैनिक तय्यार करून सर्व जाती धर्मातील काम करणाऱ्या सैनिकांच जाळं निर्माण करून संपूर्ण विधानसभा क्षेत्र अजितदादा पवार यांच्या विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मय करण्याचा निर्धार करण्यात आला,

तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा शॉल श्रीफळ पुष्पगुछ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला,तसेच होऊ घातलेल्या नगर पालिका निवडणुका, ज़िल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, लढायच्या नसून जिंकायच्या हा प्रण घेण्यात आला, यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आज पासून कामाला लागण्याचा एकमताने ठराव झाला,

तसेच आर्वी विधानसभा क्षेत्रात सत्ता आणि सरकार च्या माध्यमातून सामान्यांना विकासाचा प्रवाहात आणणे,व गाव तिथे उद्योग संकल्पनेतून आर्वी विधानसभा क्षेत्रात सरकार, शासन प्रशासनाच्या माध्यमातून बचत गट, महिला, युवक, युवती,पुरुष, यांना रोजगार उपलब्ध करून देणेसाठी प्रत्यक्षात उद्योग चळवळ देखील अधिक गतीने राबविण्यात येईल यांची माहिती दिली तसेच यां साठी गावा गावात जाऊन काम करणाऱ्या,उद्योग करण्यात रस असणाऱ्या वर्गाला, सोबत घेऊन रोजगारातून संघटना मजबुती हा मानस यावेळी व्यक्त केला, बैठकीला वर्धा जिल्हा उपाध्यक्ष, अशोकराव धानोरकर,माजी नगरसेवक दिपकराव अवचार,वर्धा जिल्हा सरचिटणीस दिनकरराव कोयरे, आर्वी तालुका अध्यक्ष अरुणराव उमरे, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, आष्टी तालुका अध्यक्ष किशोर मानमोडे, सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव चव्हाण, रोजगार व स्वयं रोजगार सेल च्या विधानसभा अध्यक्षा सोनाली जैन, रो. स्व. रो सेल तालुका अध्यक्षा सुषमा अतकरी, सोनू चिंधेकर, माधुरी सपकाळ, शेख अशपाक, कमलेश चिंधेकर,व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here