दिनांक ३१ आक्टोबर २०२३: ला स्वतंत्र भारताचे पहिले ग्रुहमंत्री भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे आमदार प्रतीनिधी सुभाष दांदळे यांच्या उपस्थितीत पार पडली.
या कार्यक्रमासाठी आमदार प्रतीनिधी सुभाष दांदळे, डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, वंदना विनोद बरडे अधीसेविका, तूलसी कुमरे परिसेविका, सतीश येडे, गणेश तूमराम, ओमकार मडावी,स्वेता लोखंडे, बंडू पेटकर, निता वाघमारे कैलास समुद्रे उपस्थित होते सुभाष दांदळे व डॉ खूजे यांनी माल्यार्पन करून दोन्ही प्रतिमांचे पूजन सर्वांनी मिळून केले.
या कार्यक्रमासाठी वंदना बरडे, बंडू पेटकर ओमकार मडावी निता वाघमारे यांनी मेहनत घेतली.