चंद्रपूर – देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे ‘एकता दौड यात्रा’ आयोजित करण्यात आली.
दि. 31 ऑक्टोंबर 2023 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित समारोपिय कार्यक्रमाचे उदघाटक प्राचार्य डॉ. प्रविण पोटदुखे होते. तर अध्यक्षस्थानी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते रघुवीर अहीर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठ प्रतिनिधी तेजस अॅलवलवार यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला अभियांत्रिकी महाविद्यालय ते गुरूद्वारा पर्यंत ‘रन फॉर युनिटी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मान्यवर अतिथींनी आदरांजली वाहीली. यावेळी प्राचार्य डॉ. प्रविण पोटदुखे व रघुवीर अहीर यांनी पटेलांच्या कार्याचे स्मरण करीत त्यांनी गृहमंत्री पदावर असतांना देशाच्या ऐक्य व रक्षणाकरीता केलेल्या असामान्य कर्तृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या दौड यात्रेत सहभागी विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी बक्षिस प्रदान करून सन्मा
नित केले.