भद्रावती येथील विसर्जन सोहळ्यात दुर्गोत्सव, शारदा उत्सव मंडळ व भाविक भक्तांचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वतीने स्वागत

0
15

भद्रावती : येथे सार्वजनिक मंडळाच्या दुर्गा उत्सवाचा विसर्जन सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित राहून सर्व मूर्तींचे दर्शन घेतले. त्यांनी सर्व मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत केले.

 

यावेळी आमदार धानोरकर म्हणाल्या, “भद्रावती येथील दुर्गा उत्सव व शारदा उत्सव हा एक मोठा उत्सव आहे. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. हा उत्सव आपल्या समाजात एकता आणि समरसता वाढवतो. मी सर्व मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे उत्सव यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल अभिनंदन करते.”

 

यावेळी भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वंदना धानोरकर, भद्रावती शहर कॉंग्रेस अध्यक्ष सूरज गावंडे, सरिता सूर, रेखा राजूरकर, जयश्री दातारकर, टिपले ताई, प्रतिभा सोनटक्के, विनयबोधी डोंगरे, विवेक आकोजवार, निखिल राऊत ,प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, सुयोग धानोरकर, लता इंदूरकर, कोमल नागोसे, कविता सुपी, रुकसाना शेख आदी उपस्थित होते.

 

 

दुर्गा उत्सवाचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विसर्जन सोहळ्यात हजारो भाविक भक्त सहभागी झाले. विसर्जन सोहळ्यात भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here