चंद्रपूर:- येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकित आरमोरी निर्वाचन क्षेत्रातुन ॲड. अशोक तुमराम यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहीती स्वत: ॲड. तुमराम यांनी दिली आहे. सध्या कोणत्याही राजकिय पक्षासोबत उमेदवारीबाबत बोलणे झाले नसल्याचे ते बोलले. पण येत्या काळात कोणत्यातरी समविचारी, पुरोगामी व समाजवादी विचारसरणीच्या राजकिय पक्षाची उमेदवारी स्विकारण्याचा मानस त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केला आहे.
ॲड. अशोक तुमराम हे उच्चविद्या विभुषित असुन आत्ताच ते उपमुख्याध्यापक म्हणुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला आहे. त्यांच्यासारखा लढवय्या उमेदवार आरमोरी निर्वाचन क्षेत्रातुन उभा राहील्यास लढत रंगतदार होईल यात शंकाच नाही. तरीही वेट ॲंड वॉच या भुमिकेत ॲड. अशोक तुमराम आहेत. पुढील वाटचालीस त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.