चंद्रपूर:- बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिवर्सिटी (BATU) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील तृतीय वर्षाचे संगणक तसेच मायनिंग च्या ८०च्या वर विद्यार्थ्यांचे २०२२ मध्ये झालेल्या रिमेडियल परिक्षेचा निकाल एक वर्ष लोटूनहि न लागल्यामुळे या युनिवर्सिटी च्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे या वर्षीचे म्हणजेच २०२३ चे शेक्षणिक नुकसान होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली होती यावेळी महाविद्यालयानी सुद्धा आपल्या परिने वारंवार ईमेलद्वारे व काॅल करून यासंदर्भात या युनिवर्सिटी च्या परिक्षा विभागाला विचारना करून सुद्धा उडवा उडविची उत्तरे त्यांच्या मार्फत दिली जात होती यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वार्षिक नुकसानाच्या भितीचे वातावरण तयार झाल्याने त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवासेना विभागीय सचिव तसेच सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांच्या कडे धाव घेऊन या संदर्भात निवेदन देऊन मदत मागितली असता प्रा निलेश बेलखेडे यांनी लगेच विभागीय कार्यालयात संपर्क करून या संदर्भात ४-५दिवसात निर्णय होऊन निकाल जाहिर करावे हि विनंती वजा ठनकाऊन सांगितले अन्यथा नागपुर विभागीय कार्यालयात येऊन विषय मार्गी लावल्या जाईल असे सांगताच विभागीय अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्फत लवकरच निकाल लावून विद्यार्थ्यांचे समाधान करणार असे आश्वासीत केले व निलेश बेलखेडे यांनी दिलेल्या विद्यापिठाला कालावधीतचं ५दिवसातचं या संबंधी चे निकाल जाहीर झाले व सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. प्रा निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान वाचले यावर विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त करून निलेश बेलखेडे यांचे आभार मानले .
Home Breaking News शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवासेना विभागीय सचिव -सिनेट सदस्य प्रा. निलेश...