चंद्रपूर- चंद्रपूर शहरात केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांकरीता वेलनेस सेंटरला मंजुरी मिळाली यासाठी माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व तत्कालीन तसेच विद्यमान केंद्रीय आरोग्य मंत्री स्तरावरुन सहकार्य लाभले मात्र या दरम्यान अनेक अडचणी उद्भवल्यानंतरही अखेरीस हे CGHS वेलनेस सेंटर रुग्णसेवेत रुजू होवून आज वर्षपूर्ती वर्धापन सोहळा साजरा होत आहे ही आनंदाची बाब असून या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना प्रभावी सेवा मिळण्याकरीता अडचणी दूर करुन विविध सेवा उपलब्ध करण्याकरीता प्रयत्न करण्याचे आश्वासन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
चंद्रपूरातील रेल्वेस्थानक परिसरात गतवर्षी ऑक्टोंबर 2022 मध्ये प्रारंभ झालेल्या या वेलनेस सेंटर च्या प्रथम वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. 21 ऑक्टोंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन हंसराज अहीर मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमास CGHS च्या अतिरिक्त संचालक डॉ. विजया मोटघरे, चंद्रपूरच्या CGHS इनचार्ज डॉ. ममता आदेवार, जॉइंट सेक्रेटरी सुरेश डोरले, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल फुलझेले, भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र गुरनूले, पेन्शनर असोसिएशनचे सचिव सुरेश धानोरकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी चंद्रपूरातील या CGHS वेलनेस सेंटर स्थापनेतील अडचणीबाबत माहिती देत बिल्डिंग व स्टाफ नियुक्ती पर्यंतच्या पाठपुराव्याबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. या वेलनेस सेंटरमधून उपचार करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्त बांधवांना प्रभावी उपचार मिळण्याकरीता ज्या काही अडचणी उद्भवल्या आहेत. त्या सोडविण्याकरीता निश्चितपणे प्रयत्न करु असे आश्वस्त दिले. खाजगी डॉक्टर्सच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी तसेच औषधांची कमतरता भासणार नाही याबाबतही आपण लक्ष घालू असे अहीर यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी डॉ. विजया मोटघरे यांनी CGHS वेलनेस सेंटर व्दारा केलेल्या मागण्यांबाबत वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन आरोग्य सेवेत उद्भवणाऱ्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यावेळी डॉ. ममता आदेवार, सुरेश डोरले यांनीही वर्धापन प्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव सुरेश धानोरकर यांनी केले. या कार्यक्रमास CGHS चे अंशुमन जावडेकर, सिंह तसेच मनोहर साळवे शंकरराव गुडेल्लीवार, वासुदेवराव आसकर, रामानंद सिंह, सुनिल कोंकमवार, विजय खापने व अन्य मान्यवर उपस्थि
त होते.