छत्रपती शिवाजी महाराजांचे हे हिंदवी स्वराज्य आहे.यासाठी वीर सावरकर म्हणतात,देहा पासून देवाकडे जातांना मधात देश लागतो.आपापल्या परीने देशासाठी योगदान द्या.उत्तम गुण घेऊन आयुष्याची परीक्षा पास करा,आई वडिलांचा संकल्प पूर्ण करा.मी विश्वास देतो,सळसळत्या रक्ताच्या,धडकत्या हृदयाच्या उर्जावान वाणीतून वंदे मातरम म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी परिवाराचा सदस्य म्हणून सदैव उभा आहो.असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य,मत्स्यव्यवसाय व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ते गिरनार चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे देशात परत आणण्याचा इंग्लड सोबत करार (MOU) झाल्यावर चंद्रपूरात प्रथम आगमन प्रसंगी गिरनार चौक येथे युवाशक्ती तर्फे आयोजित जल्लोष कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष व सत्कार मूर्ती म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रा)हरीश शर्मा,जिल्हाध्यक्ष(श)राहुल पावडे भाजपा नेते रामपालसिंह,तुषार सोम,सुदर्शन बुटले,किरण बुटले,सविता कांबळे,रवी लोणकर,धनराज कोवे,धम्मप्रकाश भस्मे,सोहम बुटले,सुरज पेदुलवार सत्यम ,भाग्यश्री भूमकर,विश्वदीप इंगळे,अनिकेत मगरे,विश्वजित पांडा,अमन गलोकर यांची उपस्थिती होती.यावेळी विविध भेट वस्तू देऊन सोहम बुटले यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने ना.मुनगंटीवार यांचा सत्कार केला.
ना.मुनगंटीवार म्हणाले,सन 2047 ला जेव्हा भारताच्या शताब्दी स्वातंत्र्याचा झेंडा आकाशात फडकेल तेव्हा,जगातील 193 देशातल्या नागरिकांनी माझ्या भारतीय राष्ट्रध्वजाला सॅल्युट करत,भारत माता की जय म्हंटले पाहिजे,इतका गौरवशाली भारत निर्माण करण्याचा संकल्प विश्वनायक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे.यासाठी युवापिढीने आत्मनिर्भर झाले पाहिजे.
आपल्याला जगाचा कप्तान व्हायचं असेल तर,यासाठी एकच विचाराचा महामार्ग आहे,तो महामार्ग छत्रपती शिवाजी महाराज आहेत.ज्यांच्या शब्दा शब्दातून आयुष्याचा एक मार्ग सापडतो.
माझ्याकडे सांस्कृतिक मंत्रालय आल्यानंतर वाघनखे आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला त्याला यश आले.1953 पासून मागणी असलेल्या अफजलखानच्या कबरीचं अतिक्रमण हटविण्याचे सौभाग्य मला मिळाले.हेच नाहीतर अयोद्धेतील राममंदिर व नवीन संसद भवनासाठी(सेंट्रल विस्टा)काष्ठ,दंडकारण्य समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील आहे,ही बाब चंद्रपूरसियांसाठी गौरवास्पद असल्याचे ना.मुनगंटीवार यांनी सांगितले.छत्रपतींची जगदंब तलवार भारतात आणण्यासाठी लढाई लढण्याची घोषणा त्यांनी केली.यावेळी रिशा गेडाम यांनी समयोचित मार्गदर्शन केले.प्रारंभी शिवरायांची आरती करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहम बुटले यांनी तर संचालन यश तुटेकर यांनी केले.अनिकेत मगरे यांनी आभार मानले.