चंद्रपुर :- येथील श्री महाकाली माता महोत्सवाच्या उदघाटन समारंभाकरीता मोरवा विमानतळ येथे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष adv. राहुलजी नार्वेकर साहेबांचे आगमन झाले असता त्यांना भेटुन स्वागत करण्यास पोलिस प्रशासनाने आमदार साहेबांने दिलेल्या लिस्टच्या व्यतीरिक्त कुणीही जाण्यास मनाई केली.
त्यामुळे मी त्यांना म्हटले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांचा शिवसैनिक व शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी असुन मी नार्वेकर साहेबांचे विशेष कार्य अधिकारी मकरंदजी पाटील साहेबांची परवानगी घेतली आहे, असे सांगून देखील मज्जाव केल्यानंतर देखील शिवसेनेच्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेत स्वागत केल्याशिवाय जाणार नाही असे स्पष्ट बजावले आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष adv. राहुलजी नार्वेकर साहेबांचे मोरवा विमानतळावरच चंद्रपुरकड़े जाताना बळजबरीने वाहनात पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
सदर प्रकार आपणास सांगण्याचे कारण एकच की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब असताना देखील प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी ज्याप्रमाणे मुजोरी करुन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना दाबण्याचा प्रकार करीत आहेत, त्याला न जुमानता आपण शिंदे साहेबांचे हात बळकट करुन चंद्रपुरात श्री माता महाकालीच्या आशिर्वाद जोमाने कामाला लागुन शिवसेना पक्ष संघटना वाढवुन दाखवु..!