सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

0
14

मुंबई : रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब सहपरिवार भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे कारण ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटाचा २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

 

चित्रपटाचे दिग्दर्शन ‘प्रदीप मेस्त्री’ यांनी केले असून चित्रपट सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, सौरभ गोखले, स्मिता शेवाळे आणि निथा शेट्टी यांच्या अभिनयाने चित्रपट उजळून आला आहे. तसेच पंकज पडघम आणि उद्भव ओझा यांनी चित्रपटाला संगीत दिले असून आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी दुमदुमनार आहेत.

 

बाब्याच्या (सिद्धार्थ जाधव) लग्नात त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रियंका (हेमांगी कवी) गोंधळ घालण्यासाठी येते परंतु गडबडे बाबाच्या (महेश मांजरेकर) आशीर्वादाने समीर (सौरभ गोखले) बाब्याच्या मदतीला येऊन तिला अडवतो. परंतु त्याच वेळी प्रियंकाचा भाऊही (कमलाकर सातपुते) येतो आणि तिथे एक नवा तूफान विनोदी गोंधळ सुरू होतो. या गोंधळात बाब्याचं लग्न होतं की नाही ? या कोड्याचं उत्तर चित्रपटात मिळणार आहे.

 

“दर आठवड्यात एक नवा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांचं मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी आणत असतो. ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हा चित्रपटही प्रेक्षकांचं मन अगदी बहरून टाकेल यात काही शंका नाही” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

 

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक कथा, विनोदासह जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपटांतील ड्रामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here