मुंबई :- पवईतील हॉटेल ट्युरिस्ट मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी पालिकेच्या एस. विभाग सहाय्यक पालिका आयुक्तांकडे केली आहे.
विहार लेक गेट पवई येथील या हॉटेलमध्ये १४ अनधिकृत खोल्या आणि स्टुडिओ असंल्याचे निवेदन पालिकेला देण्यात आले आहे. विहार लेक गेट पवई या ठिकाणी आसलेल्या या हॉटेलमध्ये एकूण,४३ खोल्या असून, त्यातील १४ खोल्या या अनाधिकृत आहेत. येथे एक स्टुडिओ उभारण्यात आला असून, तोही अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या हॉटेलमधील या बांधकामास कोण-कोणत्या विभागाने कोण-कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने परवानग्या देण्यात आल्या आहेत, हे तपासात कारवाई करावी आणि या कारवाईची माहिती देण्यात यावी, अशी मागणी विद्रोही पत्रकार पॅन्थर रिपब्लिकन नेते डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे. याच पत्रात माकणीकर यांनी म्हटले आहे की, अनधिकृत बांधकामाचे मालक के. अशोक राय यांनी सर्व बांधकाम प्रक्रिया चुकीची केलेली असून हे काम बेकायदेशीरपणे केले आहे. ते कधी झालेले आहे तसेच त्यातील अनधिकृत बाबी कोणत्या आहेत, याचाही आढावा घेण्याची त्यांची मागणी आहे. तर यासाठी जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचे ठरवून त्यांना निलंबित करण्यात यावे, असेही यात म्हटले आहे.