“वसुधैव कुटुंबकम” चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आपल्या माध्यमातून सर्वत्र पोहोचेल ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ब्रिटेनच्या भारतीयांसमोर विश्वास  ओवरसीस फ्रेंड्स ऑफ बीजेपी ” कडून लंडनमध्ये हृदय सत्कार

0
16

 

 

लंडन, दि. ५: जगातील कोणता देश मोठा आहे, याचे मूल्यांकन त्या देशातील “सुखांक”(हॅप्पीनेस इंडेक्स) बघून निश्चित करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने आता ठरविले आहे; मला अभिमान आहे की संस्कृती आणि परंपरांमुळे संस्कारित भारत देश यामध्ये नक्कीच अव्वल स्थानावर आहे; ब्रिटेन मध्ये आपण या संस्कारित देशाचे “ब्रँड अँम्बेसिडर” म्हणून काम करताहात, ‘जियो और जिने दो’ या भावनेतून “वसुधैव कुटुंबकम” चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश आपल्या माध्यमातून सर्वत्र पोहोचेल असा मला विश्वास आहे, अश्या भावना महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. येथील बांबू हाऊस येथे “ओवरसीस फ्रेंड्स ऑफ बीजेपी” च्या लंडन यूनिटकडून ना. मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते. ब्रिटेन चे खासदार विरेंद्र शर्मा, “ओवरसीस बीजेपी” लंडनचे अध्यक्ष श्री. कुलदीप शेखावत, सरचिटणीस श्री. सुरेश मंगलगिरी, महिला संघटन ‘सहेली’ च्या समन्वयक कृष्णा पुजारा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्हाला असे पंतप्रधान लाभले आहेत जे संसदेला लोकशाहीचे पवित्र मंदिर मानतात, संविधानाला सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानतात आणि देशातील प्रत्येक गरीब माणसांत देवाचा अंश बघतात. “राष्ट्र सर्वोपरि” या भावनेने काम करणाऱ्या श्री मोदी यांनी विश्वाच्या नकाशावर भारताला “नंबर वन” करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. धन, संपत्ती कमावताना ती इतरांच्या सुख-दुःखात उपयोगी पडावी यासाठी जगणे ही आपली संस्कृती आणि विचार आहे; भारतीय तत्वज्ञान, संस्कृती जगाने स्वीकारायला सुरुवात केली आहे, आपण त्याला बळ देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवापर्यंत जगातील प्रत्येक देशाने भारताला सॅल्यूट करावा अशी स्थिती आपल्याला निर्माण करायची आहे; यासाठी आपणही खारीचा वाटा उचलायला हवा असे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ब्रिटन मध्ये वास्तव्यास असलेले नागरिक भारताच्या संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधी आहेत; भारताची विचारधारा तुमच्यामुळे सर्वत्र पोहोचेल व यामुळे भारताचा सन्मान वाढणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे शिवभक्तांच्या दर्शनासाठी भारतात उपलब्ध व्हावेत या भावनेने मी लंडन ला आलोय असेही ते म्हणाले.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना मला अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचा आणि समाजाच्या हितासाठी काम करण्याची संधी प्राप्त झाली. देशातील पहिले आयएसओ मंत्री कार्यालय करण्याचं भाग्य मला लाभलं, अयोध्येतील प्रभु श्रीराम मंदिरासाठी आणि नव्या संसदेच्या प्रवेश द्वारासाठी काष्ठ पाठविण्याची संधी मला मिळाली, एवढेच नव्हे तर ज्या अफजलखानाने हिंदवी स्वराज्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला त्या अफजलखानाच्या कबरीजवळ असलेले अतिक्रमण काढण्याची संधी मला मिळाली असा उल्लेख करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्ववाला व विचारांना सातासमुद्रापार पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे असे ते म्हणाले; भारत देश विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र यांच्या नेतृत्वात यशस्वी वाटचाल करीत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

ब्रिटेन चे खासदार श्री विरेंद्र शर्मा यांनी त्यांच्या मनोगतात भारताच्या सामाजिक आणि राजकीय कार्यपद्धतीबद्दल गौरवोद्गार काढून वाघनख भारतात येण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्री. कुलदीप शेखावत यांनी प्रास्ताविक करत ना. मुनगंटीवार यांचे स्वागत केले. ओवरसीस फ्रेंड्स ऑफ बीजेपीकडून शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला लंडन येथील मराठी, गुजराती व इतर भारतीय बांधव उपस्थित होते.P

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here