महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा 8 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्हा दौरा

0
19

 

 

चंद्रपूर, दि. 06 : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री *राधाकृष्ण विखे-पाटील* चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, चिमुर येथून मोटारीने कोलारी ता. चिमुरकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता कोलारी ता. चिमूर येथे आगमन तसेच कोलारी व साठगांव येथे नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी. सकाळी 9.45 वाजता मोटारीने भिसी ता. चिमूरकडे प्रयाण. सकाळी 9.55 वाजता भिसी येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी आणि विठ्ठल रुखमाई जिनिंग अँड प्रेसिंग, भिसी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

 

सकाळी 10:30 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालय, चिमूर येथे आगमन. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, नुकसानीच्या अनुषंगाने ई-पिक पाहणी, पिक विमा आढावा, वहिवाट रस्ते, सातबारा संगणीकरण, लम्पी आदीबाबत चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक.

 

दुपारी 12.10 वाजता आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट. दुपारी 12:45 वाजता वहानगांव (बोथली) ता. चिमूरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता वहानगांव (बोथली) येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पिक पाहणी. दुपारी 1.30 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here