चंद्रपूरः- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘‘ओबीसी जागर यात्रा‘‘ म. गांधी यांच्या जयंतीदिनी दि. 02 ऑक्टोबर 2023 पासून प्रारंभ झाली असून ही यात्रा चंद्रपूर महानगरात दि 05 ऑक्टोबर ला पोहचत आहे. या यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी डाॅ आशिष देशमुख व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते करीत असून या जागर यात्रेत ओबीसी मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी सर्वश्री डी.डी. सोनटक्के, कमलाकर घटोड, रविंद्र चव्हाण, डाॅ रविंद्र यनुरकर, विनोद तुरक, वैभव लाड, विनोद बेहरे, विजय वासेकर, सौ अर्चना डेहनकर, राजेंद्र डांगे आदि मान्यवर सहभागी असून या यात्रेचे चंद्रपूर आगमनाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यंाचे नेतृत्वात जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाच्या व भाजपाच्या प्रमुख पदाधिकाÚयांद्वारे स्थानिक विश्रामगृहात जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अंमलात आणलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, वैद्यकीय शिक्षणामध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण, ओबीसी आयोगाला बहाल केलेला संवैधानिक दर्जा, इतर मागासवर्गीय विद्याथ्र्यांसाठी वसतीगृह, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली स्वाधार योजना व ओबीसी हिताच्या अनेक योजनांना घेवून ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या भाजपा ओबीसी जागर यात्रेचा मुळ उद्देश आहे. भाजपा हाच ओबीसींचा उध्दार व रक्षणकर्ता असल्याने या जागर यात्रेत ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनी सहभागी होवून आपल्या एकजूटीचा परीचय द्यावा असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा व महानगर पदाधिकारी यांनी केले आहे.
भाजपाची ही ओबीसी जागर यात्रा चंद्रपूरात पोहचल्यानंतर शहरातील विविध समाजातील मान्यवरांच्या भेटी घेवून प्रमुख पदाधिकारी त्यांचेशी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबत वार्तालाप करुन सदर जागर यात्रा वरोरा नाका येथील शासकीय विश्रामगृहातून बाईक रॅलीने सकाळी 10.30 वा आंबेडकर काॅलेज-संत कंवलराम चैक-जटपूरा गेट-प्रियदर्शनी चैक-बस स्टॅन्ड-तुकुम मार्गे-महेश भवन येथे विसर्जीत होवून सर्व मान्यवर नेते मंडळी व अतिथींचे प्रमुख उपस्थितीत दु. 12.00 वा होणाऱ्या ओबीसी जागर मेळाव्याला संबोधित करतील. या मेळाव्यास सर्वश्री विजय राऊत, हरीष शर्मा, खुशाल बोंडे, राहुल पावडे, देवराव भोंगळे , प्रमोद कडू, श्रीमती संध्याताई गुरनुले, अनिल फुलझेले, अंजली ताई घोटेकर, डाॅ मंगेश गुलवाडे, रवी गुरनुले, अल्का आत्राम, रघुवीर अहीर, विशाल निंबाळकर, अविनाश पाल, विनोद शेरकी, प्रकाश बगमारे, विद्याताई देवाळकर, रत्नमाला भोयर, अहेतेशाम अली, अंकुश आगलावे, राजू घरोटे, सुभाष कासनगोट्टुवार, शिलाताई चव्हाण, मायाताई उईके, शितल गुरनुले आदिंची उपस्थिती लाभणार आहे. तरी ओबीसी घटकातील सर्व बांधवांनी भाजपाच्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिवाकर पुध्दटवार, रवी चहारे, वंदना संतोषवार, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवी लोणकर, सचीन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, शशीकांत मस्के, प्रदीप किरमे, शैलेश इंगोले, राम हरणे, मधुकर राऊत, शाम आदमने, मुग्धा खांडे, धनराज कोवे, धम्मप्रकाश भस्मे, अमिन शेख, रुद्रनारायण तिवारी, किरण बुटले, बंडू गहूकर, अरुणा चैधरी, शिला कन्नोजवार, सुदामा यादव, संजय मिसलवार, शाम बोबडे, सचिन संदुरकर, उत्कर्ष नागोसे, सुभाश ढवस आदिंनी केले आहे.