चंद्रपूर:- गेल्या अनेक महिन्यांपासून ताडोबा अभयारण्या मध्ये कोर व बफर झोन मध्ये एकापेक्षा अधिक जिप्सी एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असल्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार सुरज ठाकरे हे वनविभाग व वनमंत्र्यांन आकडे एक कुटुंब एक रोजगार ही योजना राबवावी याकरता सतत प्रयत्नशील होते मध्ये काही प्रमाणामध्ये त्यांच्या निवेदनांना व प्रयत्नांना यश प्राप्त देखील झाले
परंतु वनविभागातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा चिरीमिरी घेत काढलेले जिप्सी पुन्हा लावून घेतली ही बाब सुरज ठाकरे यांच्या ज्ञानी आणून दिल्यानंतर त्यांनी यावर आक्षेप घेत वनविभागामध्ये भेट देऊन चांगलीच नाराजी दर्शवली तिथे त्यांना माहिती मिळाली की वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कुठलीही कल्पनाच नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच दोषी अधिकाऱ्यांना बोलून खडे बोल सुनावले व केलेली चूक तात्काळ सुधारण्याचे आदेश दिले.
ताडोबा अभयारण्य मध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध असताना देखील प्रकल्पग्रस्त गावांपैकी काही विशेष गावांनाच त्या ठिकाणी प्राधान्य देत असल्याच्या तक्रारी इतर गावकऱ्यांनी व बेरोजगारांनी केल्या होत्या सर्वांना समान रोजगाराचा अधिकार व हक्क मिळावा याकरता सुरज ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले
वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सुरज ठाकरे यांची मागणी रास्त असून जास्तीत जास्त * बेरोजगारांना रोजगार देण्याकरता आपण कटिबद्ध आहोत असे सांगितले व वन विभागाला एकापेक्षा अधिक जिप्सी असणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यासंदर्भात सांगितले
दिनांक १५/१०/२०२३ पासून सुरज ठाकरे राजुरा विधानसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील काही विशेष मागण्या घेऊन राजुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.. त्या मागण्यानपैकी वनविभागातील हा एक मुद्दा होता… तो आता मार्गी लागल्याने सुरज ठाकरे यांनी पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार व उपसंचालक ताडोबा (कोर) विभाग यांचे आभार मानले आहे.
सुरज ठाकरे हे सतत बेरोजगारांच्या रोजगारा करता आवाज उचलत आहेत. व काही प्रमाणामध्ये बेरोजगारांना रोजगार देण्यामध्ये यशस्वी सुद्धा होत आहेत त्यामुळे त्यांची लोकप्रियता युवकांमध्ये वाढत आहे.