चंद्रपूर हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणारे शहर आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून चंद्रपूरातील अनेक नामवंत व्यक्तिमत्त्व राष्ट्रीय पातळीवरही गेले आहेत. नादयोग कथ्थक केंद्रानेही चंद्रपूर च्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान असुन मृणालिनी खाडिलकर यांच्या संघर्षमय प्रवासातून विद्यार्थिनींनी धडा घेऊन चंद्रपूर चे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
नादयोग कथ्थक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आमदार जोरगेवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त आचार्य पंडित प्रशांत गायकवाड, डाॅ. साल्फळे, प्रा. जयश्री कापसे गावंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार यांनी नादयोग कथ्थक केंद्राच्या माध्यमातून नृत्य सेवेची सुरु असलेली सेवा ही मनोभावे करा व आपले नाव या क्षेत्रात मोठे करा असे आवाहन केले. पंडीत प्रशांत गायकवाड यांनीही चंद्रपूर मधे सुरु असलेली ही नृत्य साधना आणि त्यासाठी मृणालिनी खाडिलकर या घेत असलेली मेहनत याबद्दल कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या औचित्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाकाली मुर्ती व चुनरी देत मृणालिनी खाडिलकर यांचा त्या करीत असलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.