“महालिंगेश्वर विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा स्वच्छ सुंदर शाळा तालुक्यात टप्पा क्रमांक तीन मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त”

0
5

चंद्रकांत सु. गायकवाड 

  जिल्हा प्रतिनिधी 

       सोलापूर

 

महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित महालिंगेश्वर विदयालय व श्रीमान शेठ हिरालाल माणिकदास दोशी ज्युनियर काॅलेज खुडूस ता.माळशिरस जिल्हा.सोलापूर.

रविवार दिनांक:- 29/03/2026 रोजी स्वच्छ सुंदर शाळा तालुक्याचा निकाल जाहीर झाला यामध्ये विद्यालयास मानाचा समजला जाणारा स्वच्छ सुंदर शाळेमध्ये तालुक्यात दुसरा क्रमांक विद्यालयाने पटकावला आहे.

या उत्तुंग यशाबदल संस्थेचे मा.चेअरमन आर.एस चोपडे सर मा.व्हा.चेअरमन,सचिव,खजिनदार,सर्व संचालक,सर्व सल्लागार,सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी,शालेय व्यवस्थापन समिती व खुडूस,डोंबाळवाडी झंजेवाडी,पानिव,सरपंच,सर्वपदाधिकारी, ग्रामस्थ या सर्वांनी अभिनंदन केले.

त्याच बरोबर गटशिक्षणाधिकारी श्रीमती.महामुनी मॅडम यांनी फोनवरून विद्यालयाचे मा.प्राचार्य लोखंडे टी.बी सर यांचे अभिनंदन केले.सर्वांच्या अभिनंदनास पात्र झालो आहोत. त्यामुळे तालुक्यामध्ये शाळेच्या वैभवात या पुरस्कारानी भर पडली आहे.हा पुरस्कार मिळवण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक,शिक्षिका कॉलेजचे प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी खूप परिश्रम घेतले. हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here