जश्न-ईद-ए-मिलादुन्नबी निमीत्य निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

0
16

 

जश्न -ईद-ए-मिलादुन्नबी निमित्य मुस्लिम बांधवांतर्फे शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले. यावेळी आ. जोरगेवार यांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या मौलाना यांचे पुष्पहार, शॉल देऊन स्वागत केले. तसेच सर्व मुस्लीम बांधवांना जश्न-ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.

दरवर्शी प्रमाणे यंदा ही जश्न-ईद-ए-मिलादुन्नबी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म दिनानिमित्य मकरजी सिरतुन्नबी कमेटीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी, मुस्लिम समाज बांधव मोठया संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. या शोभायात्रेच्या स्वागतासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने छोटा बाजार चौक येथे भव्य स्वागत मंच उभारण्यात आला होता. यावेळी सदर शोभायात्रा स्वागत मंच्याजवळ पोहोचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी यात सहभागी मुस्लिम समाज बांधवांचे शॉल व पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शाहि गुप्त मस्जीद अध्यक्ष तथा यंग चांदा ब्रिगेडचे इमरान शेख, आसिम खान, फिरोज खान, सयद अबरार, उस्मान शेख, अस्लम खान, अय्याज अली, शेख शाकीर, शेख शादाब, शेख जोसेफ, सोहल खान, फैजान शेख, इरफान शेख, शेख जावेद, आतीफ खान आदीची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here