वIसेरा : केल्यानी होत आहे रे आधी केल्याची पाहिजे”वासेरा गावातील नागरिकांनी आपल्या पाल्य व तरुण वर्गना व्यसनाच्या खाईत जाण्यापासून रोकण्यासाठी स्वयफूर्ती ने अवैध बार बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, हे का म्हणत आहे कारण बार मालक आपल्या गावातील व आजूबाजूच्या गावातील तरुणांना व्यसनाच्या नादी लावून आपली झोळी भरण्याची तयारी करीत आहे, भलेही या बार मुळे गावातील कितीही संसार मोडले किंवा कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल पण आपलं पोट भरलं पाहिजे या बेताने अगोदर ग्रामपंचायत वासेरा मधून पद्धतशीर पणे उपाहर गृह च्या नावाखाली ना हरकत प्रमाण पत्र घेतले,एकही दिवस उपहारगृह न चालविता उपाहरगृह चालले नाही म्हणून अवैध दारू विक्री बार च्या नावाखाली सुरु केली,गावातील बुद्धिवंत नागरिकांनी या बार ला विरोध केला आहे,पण बार मालकांच्या पाठीमागे राजकीय ताकद उभी असल्याने आज मुजोरीने बार मालक गाव नशेच्या स्वरुपाने उध्वस्त करायला तयार आहे, गावातील नागरिक या बार ला आप आपल्या परीने विरोध करीत आहेत आणी शासनाने सुद्धा गावातील नागरिकांचा अंत पाहू नये,गावातील प्रत्येक नागरिक हा झोपलेला वाघ आहे आणी जर हा वाघ जागा होऊन डरकाळी फोडायला सुरवात केली तर मग शासनाला सुद्धा भारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही,कारण बार जिथे सुरु आहे तिथेच जवळच मागासवर्गीय हायस्कुल आहे आणी जर या शाळेतील विध्यार्थिनी आपल्या भविष्यासाठी ठरवलं की बार बंद झालाच पाहिजे तर यांना थांबविणार कुणीच नसेल,त्यामुळे गावाच्या भविष्यासाठी या बार ला शासनाने कायमस्वरूपी सील ठोकणे काळाची गरज आहे ( क्रमश)