चंद्रपुर :- शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. डॉ. एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार चंद्रपुर जिल्ह्यातील चंद्रपुर व राजुरा विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना पक्षाच्या संपर्क प्रमुखपदी दत्तात्रय बईतवार यांची नियुक्ति करण्यात आली.
वंदनीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री मा. ना. डॉ. एकनाथभाई शिंदे साहेब यांचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या माणसाला मिळावा.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सध्याची परिस्थिती जाणून घेवुन जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचार व प्रसार करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी जिल्ह्यातील चंद्रपुर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्याकड़े विशेष लक्ष कसे देता येईल.
त्याचप्रमाणे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणून शिवसेना पक्ष कशा मजबूत करता येईल, याअनुसंगाने सदर नियुक्ति करण्यात आली आहे.