वासेरा मधील बनसोड बार वैध की अवैध? गावातील नागरिक बार विरोधात करणार उठाव?

0
32

 

सिंदेवाही :तालुक्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वासेरा गावातील बनसोड यांचे बार वैध आहे अवैध आहे या बाबत चर्चेचा विषय सुरु आहे,कारणही तसेच आहे गावात जेव्हा अश्या चर्चा होत असताना बार मालकाला लायसंस बाबत विचारले तर तो आहे म्हणतो पण प्रत्येक्षात ना ते बार च्या दर्शनी भागात लावले दिसत नाही, लायसंस ची प्रत देण्यास सुद्धा बार मालकाला घाम फुटत आहे त्यामुळे निष्कर्ष लावून असा अर्थ निघतो की बार चा बोर्ड लावून लायसंस असल्याची दिशाभूल करून बार वैध आहे असे दाखविण्यात येत आहे पण आजच्या स्थितीत बार हे अवैध आहे,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही,
या अवैध बार मुळे गावात टिकून असलेल्या शांतता व सुव्यवस्था ही भंग होऊ शकते,गावातील तरुण पिढीला व्यसनाधीन करून त्यांचे जीवन बरबाद करण्याचा ठेका सदर बार मालकांनी घेतला असे दिसत आहे,बार जवळ च मागासवर्गीय हायस्कुल आहे,आणी इथे शिक्षण घेणाऱ्या मुलींना या पुढे खूप त्रास होणार आहे हे नक्कीच,बार मधून जर पिऊन आलेल्या व्यक्तींनी चौकात धिंगाणा घालून एखाद्या शाळेकरी मुलीचा विनयभंग होणार नाही,याची गॅरंटी कोणी घेतील का?असे प्रकार गावात घडू नये म्हणून संपूर्ण गावातील नागरिकांनी आपल्या पुढच्या पिढीला व्यसनाच्या खाईत जाण्यापासून वाचविण्याकरिता या बार विरोधात जन आंदोलन करण्याची भूमिका घेतली पाहिजे, शासनाने जरी लायसंस दिले असेल पण गावातील नागरिकांनी ठरविले की आम्हाला आमची पिढी व्यसन लावून बरबाद करायची नाही तर शासनसुद्धा झुकेल,जन आंदोलन मधून हे साध्य होऊ शकते कारण ” मोदी सरकारने शेताकऱ्याच्या विरोधात जे तीन कृषी कायदे केले होते,या कायद्याला विरोध करीत शेतकऱ्यांनी मोठे जन आंदोलन केले होते,आणी शेवटी या जन आंदोलनापुढे मोदी सरकारला ही झुकावे लागले ही जन आंदोलनाची ताकद आहे,हे ताज उदाहरणं आहे, बार मालकाच्या पाठीमागे राजकारणाची कितीही मोठी ताकद असली तरी गावाच्या नागरिकाच्या एकजूटी समोर फिकी पडेल,त्या मुळे गावातील प्रत्येक नागरिकांनी या अवैध बार चा विरोध करण्यासाठी स्वयंफूर्ती ने समोर येऊन जन आंदोलन करण्यासाठी समोर यावे,शाळेत शिकत असलेल्या मुलीवर कोणताही वाईट प्रसंग घडून येऊ नये या करीता व तिचे जीवन बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी आपल्या समोर आत्ताच जन आंदोलनाचा पर्याय आहे,या जन आंदोलन करण्याच्या बाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या दोन ओळी “” झाड झुडले शस्त्र बनेंगे, पत्थर बनेंगे बांब,भक्त बनेगी सेना”गावातील नागरिकांना
आंदोलन करण्याची नक्कीच प्रेरणा देतील,आपल्या मुला मुलीच्या सुरक्षेसाठी व पुढील पिढीला व्यसनाधीन होऊन वाचविण्यासाठी गावाकऱ्यांनी समोर येऊन अवैध असलेले बनसोड बार ला विरोध करण्यासाठी जन उठाव करण्याची गरज आहे.( क्रमश)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here