सपत्नीक अमृत कलशमध्ये माती आणी तांदूळ अर्पण करत आमदार किशोर जोरगेवार यांनी नोंदवला माझी माती माझा देश अभियानात सहभाग

0
16

 

 

 

माझी माती माझा देश या अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान आज शनिवारी चंद्रपूरात सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अमृत कलश मध्ये सपत्नीक माती आणि तांदुळ अर्पण करुन यात्रेत आपला सहभाग नोंदवीला आहे.

आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि वीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश‘ अभियान दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु करण्यात आला आहे. त्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज शनिवारी चंद्रपूरात सदर यात्रेला सुरवात झाली. यावेळी सदर यात्रा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचल्या नंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक सदर अमृत कलश मध्ये माती आणि तांदुळ अर्पण केले. या कलशातील मातीचा वापर दिल्ली येथे महान शुरविरांच्या स्मरनार्थ तयार करण्यात आलेल्या अमृत वाटीकेत केला जाणार आहे.

‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी केली जात आहे. या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात, घरा-घरात राष्ट्रभक्तीचे भावना जागृत करण्याचे पवित्र काम केले जात आहे. हे अभियान राष्ट्राचे गौरव वाढविणारे असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here