महानगर भाजपा तर्फे गणेशोत्सव स्पर्धा

0
16

भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष(श.)राहुल पावडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या स्पर्धेत नागरिकांनी व गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आले आहे.

घरगुती गणेशोत्सव स्पर्धा विषय
राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजनांचे माहिती सादरीकरण,
पर्यावरण संवर्धन, आधुनिक भारत एक विश्व गुरू,चंद्रयान-3 असे 4 विषय घरगुती स्पर्धेसाठी आहेत.
उत्कृष्ठ मुर्ती व उत्कृष्ठ देखावा. सजावटी मध्ये थर्माकॉल व प्लॉस्टिकचा वापर टाळावा.सजावटीतून सामाजिक संदेश दिलेला असावा.अश्या नियम व अटींची पूर्तता स्पर्धकांना करावी लागणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी गणेश मंडळांना राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजनांचे माहिती सादरीकरण, 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा.आधुनिक भारत एक विश्व गुरू व चंद्रयान 03 या विषयांवर सादरीकरण करावयाचे आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम पुरस्कार 51001रु,द्वितीय पुरस्कार 31001रु,तृतीय पुरस्कार) 21001रु व
5001/- रुपयांचे 10 प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जाणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमात  बक्षिस वितरण
13 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता पोलीस फुटबॉल ग्राऊंड, तुकूम येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाणार आहे.

त्यांचेच होणार परीक्षण
गणेश महोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याकरीता भाजपा पदाधिकाऱ्यांकडे फार्म जमा करावयाचे आहेत.स्पर्धेत सहभागी मंडळाला आपल्या देखाव्याचे व्हिडीओ  सादर करावयाचे असून
विषयानुरूप देखावे असेल त्याच्याकडेच परिक्षक भेट देऊन परिक्षण करतील.

परीक्षकांचा निर्णय अंतिम

स्पर्धेत सहभागी घरगुती गणेशाचे प्रत्यक्ष परिक्षणा करीता परीक्षक दि. 25 ते 27 सप्टेंबर पर्यंत भेट देणार असून त्यांचा निर्णय अंतीम राहणार आहे.घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार रेफ्रिजरेटर
व शिल्ड,द्वितीय पुरस्कार वॉशिंग मशीन व शिल्ड,तृतीय पुरस्कार सुजाता मिक्सर व शिल्ड दिले जाणार असून 10 हॉट पॉट प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here