चंद्रपुर :- भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. दादाभाऊ केदारे यांनी दि. 22 सप्टेबर 2023 ला शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा चंद्रपुर सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीचे, माजी अशासकीय सदस्य संतोष पारखी यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति करण्यात आली.
संपूर्ण भारतात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती कार्यरत असून ग्राहक संरक्षण कल्याण हक्क कायदा 1986/2019 अंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, सहकारी क्षेत्रातील कामे करण्यासाठी तसेच ग्राहक पद्धती, कायदेविषयक ज्ञान, सामाजिक कार्य व स्वतःची इच्छाशक्ति लक्षात घेवून संतोष पारखी यांची चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी सर्व अधिकाऱ्याच्या सहमतीने नियुक्ति करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे जागे व्हा ग्राहकांनो, जागे व्हा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हा, तहसील, प्रभाग व गाव पातळीवर शाखा उभारणीसाठी इच्छुक, जाणकर व्यक्ति आणि कायदेशीर अधिकारी नेमण्याचे अधिकार देण्यात आलेले असून संतोष पारखी यांनी ग्राहकांच्या अधिकाऱ्याची व सदस्याची संख्या वाढविण्याची प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
सदर निवड करण्याकरीता ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या अनमोल मार्गदर्शन व रणरागिनी राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.सौ. आशाताई पाटील व नागभीड तहसील अध्यक्ष गिरीश नवघड़े यांच्या शिफारशीनुसार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय सचिव हर्षदजी गायधनी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. मंगेशजी मोहिते यांच्या सहीनिशी सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्याच्या सहमतीने करण्यात आली.