सय्यद इसा
जिल्हा प्रतिनिधी
नांदेड.
श्रीक्षेत्र माहूर : श्रीक्षेत्र माहूर शहरासह श्री रेणुका माता मंदिरावर पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात साठविलेले पाणी वाहून जात असल्याने नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड कार्यालय अधिक्षक वैजनाथ स्वामी यांचे सह नगरसेवकांनी पैनगंगा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यावर जाऊन कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पाण्याची पाहणी केली.नदीपात्रात सुरू असलेल्या मोठ्या बंधाऱ्याच्या कंत्राटदारांच्या प्रतिनिधींना बोलावून कोल्हापुरी बंधाऱ्यात मातीचा बांध टाकून पाणी अडविण्याचे सांगितल्याने कंत्राटदार प्रतिनिधी यांनी दोन दिवसात संपूर्ण बंधाऱ्यात पाणी अडवून देण्याचे आश्वासन दिले असून माहूरच्या पाणीपुरवठा प्रति नगरपंचायत सजग असल्याने त्यांचे माहुरकरासह भाविकातून अभिनंदन होत आहे
माहूर शहरासह श्री रेणुका माता मंदिरावर पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील कोल्हापूर बंधाऱ्यात पंधरा दिवस पुरेल इतकेच पाणी राहिल्याने माहूरकरांची चिंता वाढली होती त्याची तात्काळ दखल घेत नगरपंचायत चे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी थेट बंधारा गाठून कंत्राटदारांच्या प्रतिनिधींना पाणी आडविण्याचे सूचना दिल्या यावेळी बंधार्यावर पाणीपुरवठा सभापतींचे प्रतिनिधी रणधीर पाटील, बांधकाम सभापती प्रतिनिधी रफीक सौदागर, नगरसेविका प्रतिनिधी ईरफान भाई,अफसर भाई,देविदास सिडाम,अभिय़ता विशाल ढोरे, स्वच्छता विभागाचे गणेश जाधव व ईतर उपस्थित होते.
माहूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकमेव पैनगंगा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधारा असून येथे आमदार भीमराव केराम यांच्या माध्यमातून नवीन मोठ्या बंधाऱ्याचे काम शारदा कंट्रक्शन कडून जलद गतीने करण्यात येत असले तरीही बंधाऱ्यातील पाणी त्यांना डायव्हर्ट करून दुसरीकडून काढावे लागले आता मात्र नदी पात्रातील पाण्याची धार कमी झाल्याने कोल्हापुरी बंधाऱ्यात अर्ध्यावरच माती टाकून पाणी थांबविल्याने पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने माहूरकरांची चिंता वाढली होती त्यामुळे नगरपंचायत माहूर कडून याप्रकरणी तात्काळ दखल घेत पाहणी केल्याने आता संपूर्ण कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी थांबणार असल्याने पाण्याची चिंता मिटणार आहे त्यामुळे माहूरकरासह भाविकातून नगरपंचायत चे पदाधिकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे