सय्यद इसा
जिल्हा प्रतिनिधी
नांदेड.
संपुर्ण जागातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या बौद्धगया येथील ‘महाबोधी महाविहार’ यावरील बौद्धेत्तरांचा ताबा काढून बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी माहूर येथील धम्मबांधवांनी आज दि. २४ मार्च रोजी माहूर तहसिलदारामार्फत महामहीम राष्ट्रपतींकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून संपुर्ण भारतासह जगभरातून होत असलेल्या या मागणीला माहूर तालुक्यातील बौद्ध अनुयांयांचा देखील पाठींबा असल्याचे निवेदनातून सांगितले आहे…
भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया यांना तहसीलदार माहूर मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद बाबींप्रमाणे.. संपुर्ण जगातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले बौद्धगया येथील ‘महाबोधी महाविहार’ सन 1949 च्या कायद्यानुसार बौद्धेतरांच्या ताब्यात असून हे महाविहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध भिक्कू संघ व बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी ऐतिहासिक महाविहार मुक्ती आंदोलन सुरु आहे… तर ‘महाबोधी महाविहार’ हे युनेस्को नुसार विश्वधरोहर असून सन 1949 च्या मंदिर कायद्यानुसार बौद्धेतरांच्या ताब्यात असल्याने हा संपूर्ण जगभरातील बौद्ध अनुयायी बांधवावर अन्याय आहे…. त्यामुळे संपुर्ण भारतभर पेटलेल्या या आंदोलनाला माहूर ता. जि.नांदेड महाराष्ट्र येथील बौद्ध अनुयायी सक्रीय पाठिंबा देत असून महाबोधी महाविहार बाबत करण्यात आलेला सन 1949 चा मंदिर अॅक्ट रद्द करून पूर्णपणे बौद्ध भिक्कू संघ व बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.. अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आले आहे…
निवेदनावर प्रामु्ख्याने भिक्कूणी आर्याजी खेमा , प्रकाश गायकवाड, डॉ. झनक मानकर, मनोज किर्तने, रेणूकादास वानखेडे, विजय भगत, सिद्धार्थ तामगाडगे, आकाश कांबळे, राजेश मगरे, प्रविण बरडे, विक्रांत भगत, प्रतिक कांबळे, आदेश लांडगे, गौतम खडसे, अमृत जगताप, सुशिल रणवीर, सिद्धार्थ भवरे, त्रिशरण आठवले, धम्मपाल मुनेश्वर, हिरामण वाघमारे, संजय मानकर, दिपक मुनेश्वर, देवानंद भालेराव शे. रफीक शे. अली. दिपक कांबळे, शामराव राऊत, समाधान कांबळे तसेच गणेश खडसे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत…