मा.ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष सहकार्यातून, सौजन्याने व जे.सी.आय. च्‍या संयुक्त विद्यमाने तान्‍हा पोळ्याचे उत्‍साहात आयोजन तान्‍हा पोळ्याद्वारे कृषी संस्‍कृतीचे दर्शन घडते – राहूल पावडे

0
17

भारत हा कृषी प्रधान देश असून शेतकरी बांधव मोठ्या उत्‍साहाने पोळा हा सण साजरा करतात, तसेच पोळ्याच्‍या दुस-या दिवशी तान्‍हा पोळा साजरा करण्‍यात येतो. यामध्‍ये बालगोपाल मोठ्या उत्‍साहाने, आनंदाने सहभाग घेतात. त्‍यामुळे हा सण भारतातील विविधता दर्शवित एकात्‍मतेचे प्रतिक ठरला आहे, तसेच तान्‍हा पोळा कृषी संस्‍कृतीचे दर्शन घडविणारा महत्‍वाचा सण आहे. असे प्रतिपादन चंद्रपूर महानगराचे अध्‍यक्ष राहूल पावडे यांनी व्‍यक्‍त केले आहे.

दि. १५ सप्‍टेंबर २०२३ रोजी स्‍थानिय गांधी चौक येथे तान्‍हा पोळ्याचे राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या  विशेष सहकार्यातुन,सौजन्याने भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तथा जे.सी.आय. च्‍या वतीने तान्‍हा पोळा उत्‍सव आयोजित करण्‍यात आला होता. यावेळी राहूल  पावडे बोलत होते. ते पुढे म्‍हणाले शेतकरी बांधव हा जगाचा पोशिंदा आहे. आपण कायम त्‍यांचे ऋणी राहीले पाहीजे. तान्‍हा पोळा उत्‍सव साजरा करताना बालगोपालांच्‍या चेह-यावरील आनंद मनाला समाधान व प्रेरणा देणारे आहे. यावेळी जे.सी.आय. अध्‍यक्ष बंटी दगली,भाजपा ज्येष्ठ नेते प्रमोद कडू ,डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, अंजली घोटेकर, सविता कांबळे, अजय सरकार, श्‍याम कनकम, प्रदिप किरमे, रणजीत डवरे, राजेंद्र खांडेकर, सचिन कोतपल्‍लीवार, रवी लोनकर, चॉंद सय्यद, सुरज पेदुलवार, सत्‍यम गाणार, कृष्‍णा चंदावार, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे,आकाश ठुसे, जेसी सुशील मूंधड़ा, जेसी नितिन पुगलिया, जेसी नंदू भईया, जेसी श्याम धोपते,  जेसी मनीष पटेल, जेसी शीतल सुराना,  जेसी अभिषेक कांस्टिया, जेसी समीर साल्वे, जेसी कृष्णा सांगले, जेसी महेंद्र जोशी,अध्याय अध्यक्ष जेसी देवेंद्र डगली, सचिव जेसी चेतन रामटेके, जेसी राजा रघाटाते, जेसी गौतम भंडारी, जेसी संजय बजाज , जेसी रोहन शाह,जेसी कृष्णा भाऊ , जेसी काजल कुकरेजा, जेसी धीरज राठी, जेसी धर्मेंद्र संक्लेचा , जेसी चेतन यादव, जेसी चेतन व्यास, जेसी संकेत पिंपलकर, जेसी नितिन टहलियानी, जेसी भारत कश्यप, जेसी प्रियंका गिरड़कर,सुशांत शर्मा, बाळू कोल्‍हणकर,आकाश मस्के, सलमान पठाण, रेणु घोडेस्‍वार, मोनिषा महातव, मुग्‍धा खांडे, प्रभा गुडधे,रितेश वर्मा,राहुल नगराळे,विकी मेश्राम,गौरव कुषमवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍य वतीने बालगोपालांना पुरस्‍कार देण्‍यात आले. यामध्‍ये प्रथम पुरस्‍कार सात हजार एक, द्वितीय पुरस्‍कार पाच हजार एक तर तृतीय पुरस्‍कार तीन हजार एक रुपये देण्‍यात आले. यावेळी बालगोपालांच्‍या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरीक व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here